Join us

असं सजलंय सिद्धार्थ-मितालीच्या स्वप्नांचं घर; पाहा Inside video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 09:35 IST

Siddharth Chandekar: काही महिन्यांपूर्वीच मिताली आणि सिद्धार्थने मुंबईत त्यांच्या हक्काचं घर खरेदी केलं. त्यांनी अत्यंत सुंदरतेने हे घर सजवलं आहे.

मराठी कलाविश्वातलं गोड कपल म्हणजे मिताली मयेकर (mitali mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar). एखाद्या फिल्मी कथेला शोभावी अशी त्यांची लव्हस्टोरी आहे. २०२१ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली तेव्हापासून ते कायम त्यांच्या मॅरिड लाइफमुळे चर्चेत येतायेत. अलिकडेच त्यांनी विदेश दौरा केला येथील अनेक भन्नाट फोटो, व्हिडीओ त्यांनी नेटकऱ्यांसोबत शेअर केले होते. सध्या त्यांचं मुंबईतील घर चर्चेत आलं आहे.

काही महिन्यांपूर्वीच मिताली आणि सिद्धार्थने मुंबईत त्यांच्या हक्काचं घर खरेदी केलं. या घरातली अनेक फोटो त्यांनी नेटकऱ्यांसोबत शेअर केले होते. यावेळी मात्र, सिद्धार्थने त्याच्या घराची लहानशी झलक शेअर केली आहे.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, मिताली आणि सिद्धार्थ घरातील प्रत्येक कोपरा विचारपूर्वक सजवला आहे. त्यांनी घरासाठी निवडलेली रंगसंगती, फर्निचर यांची अत्यंत विचार करुन निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हे घर आणखीनच सुंदर दिसतंय. बऱ्याचदा मिताली आणि सिद्धार्थ याच घरात फोटोशूट करतात किंवा काही प्रमोशनल व्हिडीओदेखील करतात.  

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा