Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 11:38 IST

दुनियादारी फेम मराठमोळ्या अभिनेत्याने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर त्याने सोशल मीडियावर त्याच्या भावना शेअर केल्या (pm narendra modi)

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. येत्या २० तारखेला मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशातील अन्य भागांत मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ईशान्य मुंबईतील रोड शोमध्ये सहभागी होत भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला. यावेळी मराठमोळा अभिनेता सुशांत शेलारने नरेंद्र मोदींची खास भेट घेतली. 

सुशांत शेलारने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. हे शेअर करत सुशांत म्हणाला,  "आयुष्यातला मौल्यवान क्षण. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी साहेब यांची भेट हे शक्य झालं माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळे." अशी पोस्ट सुशांतने केलीय. सुशांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारवल्याचं दिसतंय.

सुशांत शेलार हा गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय आहे. सुशांतचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सुशांत अनेकदा  एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रचारसभेच्या कार्यक्रमाला गेलेला दिसला. याशिवाय तो सोशल मीडियावर शिंदे गट आणि शिवसेनेचा प्रचार करणाऱ्या पोस्ट शेअर करत असतो. सुशांतने 'धर्मवीर', 'दुनियादारी' अशा सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीनरेंद्र मोदीएकनाथ शिंदेमुंबई