Join us

'कोणतीही पोस्ट अधिकृत समजू नये'; हेमंत ढोमेचं फेसबुक अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 14:47 IST

Hemant dhome: अभिनेता हेमंत ढोमे यांचं फेसबुक पेज हॅक झालं असून त्याच्या नावात बदल केल्याचं दिसून येत आहे. याविषयी माहिती मिळताच हेमंतने तात्काळ इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली.

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याच्या घटना सर्रास समोर येत आहेत. यामध्येच आता अभिनेता हेमंत ढोमे (hemant dhome) याचं फेसबुक पेज हॅक झालं आहे. याबाबत त्याने तक्रार दाखल केली असून सध्या पेज रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हेमंतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अभिनेता हेमंत ढोमे यांचं फेसबुक पेज हॅक झालं असून त्याच्या नावात बदल केल्याचं दिसून येत आहे. याविषयी माहिती मिळताच हेमंतने तात्काळ इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. तसंच या पेजवर शेअर करण्यात आलेली कोणतीही पोस्ट अधिकृत समजू नका, अस आवाहनही केलं.

"माझे facebook अकाऊंट हॅक झाले आहे...संबंधित पेजवर पोस्ट होणारी कोणतीही पोस्ट तूर्तास अधिकृत समजू नये. पेज रिकव्हरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.... लवकरात लवकर पेज पूर्ववत होईल अशी आशा...धन्यवाद!", असं म्हणत हेमंतने इन्स्टावर पोस्ट शेअर केली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन