Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दादा कोंडकेंनी लिहिलंंय मी पहिल्यांदा घाबरलो होतो पण...'; अशोक सराफ यांनी खरं काय ते सांगितलंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:18 IST

दादा कोंडकेंसोबत पहिल्या सिनेमात काम करताना अशोक सराफ घाबरले होते का? याचा खुलासा त्यांनी केलाय (ashok saraf, dada kondke)

अशोक सराफ हे भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. अशोक सराफ यांना आपण  मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत काम करताना पाहिलंय. इतकंच नव्हे तर वयाची ७५ वर्ष झाली तरीही अशोक सराफ रंगभूमीवरही कार्यरत आहेत. अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध सिनेमात अभिनय करुन लोकांचं प्रेम मिळवलंय. अशोक सराफ  यांचा पहिला सिनेमा म्हणजे 'पांडू हवालदार'. या सिनेमाच्या वेळी अशोक सराफ घाबरले होते का? याचा खुलास खुद्द त्यांनीच केलाय.

अशोक सराफ यांनी सांगितला अनुभव

focusedindian या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांना इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत कोणासोबत काम करताना दडपण आलं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी अशोक सराफ म्हणाले, "कधीच असं झालं नाही. घाबरायचंच नाही असंच ठरवलंय आयुष्यात. मराठीत मी पहिल्यांदाच उभा राहिलो ते दादा कोंडकेंसोबत.दादा कोंडकेंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की, तो पहिल्यांदा घाबरला होता. नाही हो नाही. तसं नाहीय."

अशोक सराफ पुढे म्हणाले, "कशाला नर्व्हस व्हायचं. मला माहितीये कसं करायचं ते. दडपण येण्याची शक्यता आहेच. पण माझ्याबाबतीस नाही झालं असं. मला बरंच काही येत होतं असं नाही. पण एक आत्मविश्वास असतो असं काही नाही होणार. मला काय करायचंय याबाबतीत मी पक्का होतो त्यामुळे असं कधीच झालं नाही. माझी पण तेव्हा सुरुवातच होती. पण तुम्ही स्वतःबाबतीत कॉन्फिडन्ट असाल ना तर असं कधीच काही होत नाही." अशाप्रकारे अशोक सराफ यांनी त्यांचा अनुभव सांगितला

 

टॅग्स :अशोक सराफदादा कोंडकेमराठी चित्रपट