Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'नाकावरच्या रागाला...'; लेकीसह अंशुमनने रिक्रिएट केलं अशोक सराफ यांचं लोकप्रिय गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:42 IST

Anshuman vichare: अंशुमनने त्याच्या सोशल मीडियावर अन्वीसोबतचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अंशुमनने अगदी अशोक सराफ यांच्याप्रमाणे गेटअप केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे बऱ्याचदा त्याच्या लाडक्या लेकीमुळे चर्चेत येत असतो. उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा अंशुमन सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो कायम त्याच्या लेकीसोबत अन्वीसोबतचे मजेदार व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्याने अभिनेता अशोक सराफ यांचं गाणं नव्या अंदाजात रिक्रिएट केलं आहे.

अशोक सराफ यांचा 'कळत नकळत' हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. या चित्रपटातील 'नाकावरच्या रागाला औषध काय' (Nakavarchya Ragala Aushadh Kay Song) हे गाणं तुफान गाजलं. विशेष म्हणजे आजही हे गाणं प्रेक्षक तितक्याच आवडीने ऐकतात. हेच गाण अंशुमन आणि त्याच्या लेकीने रिक्रिएट केलं आहे. विशेष म्हणजे चिमुकल्या अन्वीने या गाण्यात दिलेले एक्स्प्रेशन्स खरोखर वाखाणण्याजोगे  आहेत.

अंशुमनने त्याच्या सोशल मीडियावर अन्वीसोबतचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अंशुमनने अगदी अशोक सराफ यांच्याप्रमाणे गेटअप केला आहे. तर, अन्वीनेही त्याला तोडीस तोड अभिनय करुन टक्कर दिली आहे. सध्या या बापलेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :अंशुमन विचारेअशोक सराफसेलिब्रिटीसिनेमा