Join us
Daily Top 2Weekly Top 5

महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:54 IST

महेश कोठारे होते म्हणून 'राजा हिंदुस्थानी'मधला आमिर- करिश्माचा किसिंग सीन पडद्यावर दिसला

आमिर खान-करिश्मा कपूर जोडीचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'राजा हिंदुस्तानी'. 90 च्या दशकातील हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला होता. या चित्रपटातील किसिंग सीनची आजही चर्चा होते. पण, तुम्हाला माहितेय लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांच्यामुळे तो किसिंग सीन सिनेमात दिसला. लोकमत फिल्मीला दिलेल्या  मुलाखतीत महेश यांनी आमिरच्या राजा हिंदुस्थानी सिनेमाचा एक खास किस्सा शेअर केला.

महेश कोठारे यांची बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानशी चांगली मैत्री आहे. महेश कोठारे यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आमिर खानबरोबरची एक खास आठवण शेअर केली. महेश कोठारे जेव्हा सेन्सॉर बोर्डावर होते, तेव्हा आमिर खानने त्यांना 'राजा हिन्दुस्तानी' सिनेमातील किसिंग सीनवर कट होणार नाही, यासाठी विनंती केली होती. 

महेश कोठारे म्हणाले, 'लो में आ गया' या माझ्या सिनेमात मला आमिरला घ्यायचं होतं आणि म्हणून मी त्याला भेटलो. त्याला मी माझा 'मासूम' सिनेमा दाखवला. त्याला तो खूप आवडला. मी सिनेमाबद्दल सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला कि तुझी स्क्रिप्ट आण आपण बघूया. त्याचवेळी त्याचा राजा हिंदुस्थानी सिनेमा रिलीज होणार होता आणि त्यावेळी मी सेन्सॉर बोर्डावर होतो. हे त्याला समजताच आमिरने मला विनंती केली कि. त्याचा सिनेमातील किसिंग सीन कट नाही झाला पाहिजे. मी ते मान्य केलं आणि सेन्सॉर बोर्डातील माझ्या सहकाऱ्यांना माझ्या स्टाईलने समजावलं आणि तो सीन कट झाला नाही. लोकांना तो सीन खूप आवडला'.

'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात पावसाचा सीन आहे. त्यात आमिर खान करिश्मा कपूरला किस करतो. हा सीन त्यावेळी खूप गाजलेला. या इंटिमेट सीनआधी दोघे थोडे टेन्शनमध्ये होते. हा एक किसींग सीन शूट करण्यासाठी 47 रिटेक आणि चार दिवस लागले होते. त्यानंतर परफेक्ट शॉट मिळाला होता. 3 दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर जेव्हा डायरेक्टरला परफेक्ट शॉट मिळाला. तेव्हा आमीर खान आणि करिश्मा कपूर आनंदाने नाचले होते. त्यावेळी ही जोडी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शूट करत होते.  

टॅग्स :महेश कोठारेसेलिब्रिटीबॉलिवूडआमिर खानकरिश्मा कपूर