Kranti Redkar Reveals Twin Daughters Faces : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे कायम चर्चेत असता. त्यांच्या जुळ्या मुली झिया आणि जायदादेखील चाहत्यांना फार आवडतात. ज्यांना प्रेमाने गोदो आणि छबील अशी टोपणनावे दिली आहेत. क्रांती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत तिच्या चिमुकल्या मुलींचे किस्से शेअर करायची. पण, त्यात ती मुलींचे चेहरे दाखवत नव्हती. त्यामुळे तिच्या मुली नेमक्या कशा दिसतात, याबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. नुकतंच क्रांती रेडकरनंसोशल मीडियावर व्हिडीओ शेअर आपल्या लाडक्या लेकींची झलक चाहत्यांना दाखवली आहे. तसेच तिनं हा निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट करत चाहत्यांना एक खास विनंती केली आहे.
अलिकडेच क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे हे आपल्या मुलींसह अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला पोहचले होते. यावेळी रिसेप्शनमधील त्यांच्या मुलींचे काही व्हिडीओ व्हायरल झाले. ज्यामध्ये त्यांचे चेहरा स्पष्टपणे दिसले. या व्हिडिओंमुळे मुलींचे चेहरे आपोआप 'रिव्हील' झाले असले तरी, क्रांती रेडकरनं ही संपूर्ण परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली. याबद्दल कुठलाही त्रागा किंवा राग व्यक्त न करता, क्रांतीनं उलट सकारात्मक भूमिका घेतलीय. मुलींचे चेहरे उघड झाल्यानंतर क्रांतीने स्वतःच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये गोदो आणि छबील या दोघी अत्यंत गोंडस पद्धतीने प्रतिक्रिया देताना दिसतात. या व्हिडीओत गोदो व छबिल एकमेकींना म्हणतात, "आईने आपले चेहरे लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता आपले चेहरे रिव्हिल झाले आहेत". यानंतर दोघीही आपण खूप दुःखी असल्याचं म्हणतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद आणि निरागस हास्य स्पष्टपणे दिसून येतं. मुलींनी दिलेली ही गोड प्रतिक्रिया आणि क्रांतीने घेतलेला सकारात्मक निर्णय यामुळे चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे.
क्रांतीनं या व्हिडीओसोबत मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणाली, "नमस्कार सगळ्यांना, काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात छबिल व गोदो यांचे चेहरे दिसले. त्यानंतर अनेक मीडिया पेजेसवर त्यांचे व्हिडीओ पोस्ट झाले. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि आम्हाला ती नियंत्रित करता आली नाही. त्यामुळे आता आम्हाला वाटलं की पुन्हा त्यांचे चेहरे लपवण्यात काहीच अर्थ नाही. जर तसं केलं तर ते खरंच खूप हास्यास्पद वाटेल".
पुढे ती म्हणाली, "त्यांच्या सामान्यपणे जगण्याच्या इच्छांना आम्ही दाबून ठेवू इच्छित नाही. भीती असली तरी त्यांनी सतत भीतीच्या वातावरणात मोठं व्हावं, असं आम्हाला वाटत नाही. त्यांना स्वावलंबी, मजबूत बनवायचं आहे. त्यांनी सतत कोणाच्या आश्रयात असू नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आतापासून हे सगळं सोपं करतेय. यापुढे चेहरे लपवायचे नाही. फक्त तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की त्यांना नेहमी आशीर्वाद द्या आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा", असं तिनं पोस्टच्या शेवटी म्हटलं.
Web Summary : Kranti Redkar revealed her twin daughters' faces after videos from a reception surfaced online. Previously kept private, the faces of 'Godo' and 'Chhabil' are now public. Kranti requests blessings and love for her children.
Web Summary : क्रांति रेडकर ने रिसेप्शन के वायरल वीडियो के बाद अपनी जुड़वां बेटियों का चेहरा दिखाया। पहले निजी रखी गईं, 'गोदो' और 'छबील' के चेहरे अब सार्वजनिक हैं। क्रांति ने अपनी बेटियों के लिए आशीर्वाद और प्यार मांगा है।