Join us
Daily Top 2Weekly Top 5

“मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटलं तर...”, हेमांगी कवीच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:25 IST

हेमांगी कवीने मासिक पाळीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाली...

 

लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. हेमांगी समाजातील अनेक घडामोडींवर व्यक्त होताना दिसते. अभिनयाबरोबरच ती बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. अनेकदा हेमांगी तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. कित्येकदा तिला ट्रोलही करण्यात आलं आहे. सध्या हेमांगीच्या अशाच एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेमांगीने तिच्या फेसबुकवरुन मासिक पाळी संदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मासिक पाळीत मंदिरात जाण्याविषयी भाष्य करण्यात आलं आहे. हेमांगीने ही पोस्ट शेअर करत याबाबत तिचं मत मांडलं आहे. “खुप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका!”, असं हेमांगीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

रजनीकांतच्या ‘जेलर’ची हवा! पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई, कमावणार 'इतके' कोटी

हेमांगीने याआधीही एका मुलाखतीत मासिक पाळीबद्दल वक्तव्य केलं होतं. “आमच्या घरी मासिक पाळी पाळली जात नाही,” असं हेमांगी म्हणाली होती. “केवळ मुंबईत राहतो म्हणून नाही तर गावीही हीच लिबर्टी आहे. पूजा आहे म्हणूनही माझ्या आजीने कधी असं सांगितलेलं नाही. लोकांना समजलं तर ते चर्चा करतील, त्यामुळे कोणाला सांगू नकोस, असं माझी आजी सांगायची," असंही तिने मुलाखतीत सांगितलं होतं.

“नितीन गडकरींना टॅग करुनही...”, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलच्या तक्रारीनंतर मराठी अभिनेत्री नाराज

दरम्यान, हेमांगी सध्या ‘जन्मवारी’ या तिच्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दो गुब्बारे’ या वेब सीरिजमध्येही हेमांगी झळकली होती. ‘ब्लाइंड डेट’ या सीरिजमध्ये हेमांगीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :हेमांगी कवीमासिक पाळी आणि आरोग्यमराठी अभिनेता