Join us
Daily Top 2Weekly Top 5

Genelia Deshmukh Video : 'श्रावणी'ची एंट्री आणि शिट्ट्यांचा आवाज, 'वेड'चा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ; जिनिलियाने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:24 IST

जिनिलियाने वेड मध्ये श्रावणीची भुमिका साकारली आहे. श्रावणीच्या एंट्रीला थिएटरमध्ये होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज असा एकंदर प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत.

Ved Marathi Movie : रितेश देशमुख (Riteish Deshmukh )आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ हा मराठी सिनेमा गेल्या शुक्रवारी (30 डिसेंबर) प्रदर्शित झाला. रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे. शिवाय हा तिचा पहिला मराठी सिनेमा आहे. रितेश व जिनिलियाच्या या सिनेमानं सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. होय, प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल जिनिलियाने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

पहिलाच मराठी चित्रपट पण तितक्याच आत्मविश्वासासह जिनिलिया मोठ्या पडद्यावर आली आहे. जिनिलियाने वेड मध्ये श्रावणीची भुमिका साकारली आहे. श्रावणीच्या एंट्रीला थिएटरमध्ये होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज असा एकंदर प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत. यानिमित्त जिनिलियाने सोशल मीडियावर लिहिले, 'रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं.पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

Ved Marathi Movie box office collection : ‘वेड’ने अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘याड’...; दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

३० डिसेबर रोजी वर्षाच्या शेवटी सिनेमा प्रदर्शित झाल्यानं सिनेमाचे सगळे शो हाऊसफुल झाले. पहिल्याच दिवशी या सिनेमाने दमदार ओपनिंग करत, महाराष्ट्रातील टॉप 5 दमदार ओपनिंग करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत पाचवं स्थान मिळवलं.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.50 कोटींची कमाई केली होती.  नव्या वर्षात वेड हा सिनेमा आणखी कमाई करेल यात काही शंका नाही.

टॅग्स :वेड चित्रपटजेनेलिया डिसूजारितेश देशमुखसोशल मीडिया