Join us

चाहत्यानं थेट घातली लग्नाची मागणी, प्राजक्ता माळी उत्तर देत म्हणाली "माझं काही खरं नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:34 IST

प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

Prajkata Mali: प्राजक्ता माळी (Prajkata Mali) हा मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने चाहत्यांना आपलसं केलं आहे.  प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम त्यांच्या संपर्कात राहते. करिअरमध्ये यशाचं शिखर गाठलेली प्राजक्ता रिअल लाइफमध्ये मात्र अद्याप सिंगल आहे. अनेकदा प्राजक्ताला तिच्या लव्हलाइफबद्दल विचारण्यात आलं आहे. आता तर एका चाहत्यानेच तिला थेट लग्नाची मागणी घातली आहे. 

अलिकडेच प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर 'Ask me a  Question' हे सेशन ठेवलं होतं. "चला आज पहिल्यांदा अशाप्रकारे गप्पा मारूया, विचारा!", असं म्हणत तिनं चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली. त्याने प्राजक्ताला विचारलं, "तु माझ्या बरोबर लग्न करणार का? तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे". यावेळी तिनं या प्रश्नाला दिलेल्या  उत्तराने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताने म्हटलं, "माझं काही खरं नाही… तुम्ही करुन टाका.. (सगळेच जे थांबलेत) (जनहित में जारी..) (Spread the word..)".

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'फुलवंती' हा चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलचं गाजवलं. सिनेमातील  प्राजक्ताच्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्याला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. याशिवाय, प्राजक्ताने तीन वर्षांपूर्वी कवितांसंग्रह प्रकाशित केला होता. त्यामुळे तिच्याकडे कवयित्री म्हणून पाहिले जाते. नुकतंच तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून दोन वर्षांपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर (चंद्रपूर) आणि नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे.  

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडप्राजक्ता माळीसेलिब्रिटीलग्नमराठी अभिनेता