Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धर्मवीर २' बघायचाय? आज तिकीट झालेत खूपच स्वस्त, जाणून घ्या नवरात्रीनिमित्त विशेष ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 09:24 IST

'धर्मवीर २' सिनेमाचं तिकीट आज खूपच स्वस्त झालंय. जाणून घ्या सिनेमाच्या खास ऑफरबद्दल (dharmaveer 2)

'धर्मवीर २' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या खास प्रतिसादानंतर 'धर्मवीर २'ची उत्सुकता शिगेला होती. अखेर २७ सप्टेंबरला 'धर्मवीर २' रिलीज झाला. पहिल्या दिवसापासूनच 'धर्मवीर २' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच नवरात्रीचे खास औचित्य साधत 'धर्मवीर २' हा सिनेमा रसिक प्रेक्षकांसाठी शुक्रवार ४ ऑक्टोबरला अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरला पाहण्याची अनोखी ऑफर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.   

'धर्मवीर २' फक्त ९९ रुपयांत

शिवसेनेचे दिवंगत नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर'  सिनेमाचा पुढील भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित  करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या सिनेमाला सर्वत्र मिळत असून आज शुक्रवारी सिनेमाचं तिकीट ९९ रुपये झालंय. महाराष्ट्रातील कोणत्याही थिएटरमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा फक्त ९९ रुपयांत बघायला मिळणार असल्याने सिनेमाला याचा नक्कीच फायदा होईल.

'धर्मवीर २' ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

१५०० पेक्षा ही अधिक शोजने या सिनेमाची सुरुवात करण्यात आली. धर्मवीर चित्रपटानंतर "धर्मवीर २" चित्रपटात नक्की काय दाखवले जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. दरम्यान 'धर्मवीर २' सिनेमाने फक्त सहा दिवसात १२.२८ कोटींची कमाई केलीय. अशातच आज सिनेमाचं तिकीट फक्त ९९ रुपये असल्याने 'धर्मवीर २' ला बॉक्स ऑफिसवर याचा नक्कीच फायदा होईल. केवळ मुंबई, ठाणे,पालघर नाही तर पुणे,कोल्हापुर, इचलकरंजी, नाशिक, छ.संभाजीनगर, मराठवाडा  अशा संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :प्रसाद ओक प्रवीण तरडेमराठी चित्रपट