Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा!' आनंद दिघेंची गर्जना, 'धर्मवीर २'च्या नव्या ट्रेलरची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:11 IST

धर्मवीर २ च्या नव्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलंय. अल्पावधीत सिनेमाच्या नवीन ट्रेलरने प्रेक्षकांची पसंती मिळवलीय (dharmaveer 2)

सध्या प्रसाद ओकच्या आगामी 'धर्मवीर २' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची गाणी, टीझर, ट्रेलरने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलंय. 'धर्मवीर २' (dharmaveer 2) च्या रिलीजला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. अशातच नुकताच सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज झालाय.  'जो हिंदुत्वाचा वारसा जपेल तोच देशावर राज्यही करेल!', अशी टॅगलाईन असणारा 'धर्मवीर २'च्या नवीन ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलंय. 

'धर्मवीर २' चा नवीन ट्रेलर

'धर्मवीर २'चा नवीन ट्रेलर अवघ्या काही सेकंदांचा आहे.  'जो हिंदुत्वाचा वारसा जपेल तोच देशावर राज्यही करेल!' अशी गर्जना आनंद दिघे देताना दिसत आहेत.  धर्मवीर आनंद दिघेंच्या व्यक्तिमत्त्वाचे नवे पदर "धर्मवीर - २" च्या ट्रेलरमधून उलगडणार आहेत. या सिनेमाच्या नवीन ट्रेलरमुळे अंगावर अक्षरशः काटा येत आहे. आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओकचा जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय. नजरेत आग आणि समोरच्यावर धाक असणारा प्रसाद ओक आनंद दिघेंच्या भूमिकेत लक्ष वेधून घेतोय.  

या दिवशी रिलीज होणार 'धर्मवीर २' 

"धर्मवीर -२" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी "धर्मवीर -२" मधील  गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. २७ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉंचला सलमान खान, अशोक सराफ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती होती.

टॅग्स :प्रसाद ओक प्रवीण तरडेअशोक सराफसलमान खान