Join us

शिवानी- अजिंक्यच्या नात्याला होता कुटुंबाचा विरोध; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 15:20 IST

Shivani surve: अजिंक्य आणि शिवानी यांना घरातल्यांचं मन वळवण्यासाठी जवळपास ४ वर्ष लागले.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे (Shivani surve). 'देवयानी' या मालिकेमुळे नावारुपाला आलेली शिवानी नुकतीच 'झिम्मा 2' या सिनेमात झळकली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा होत आहे. अलिकडेच शिवानीने सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींवर भाष्य केलं. यावेळी बोलत असताना अजिंक्य आणि तिच्या नात्याला कुटुंबियांनी विरोध केला होता, असा खुलासा तिने केला.

 गेल्या ५ ते ६ वर्षांपासून शिवानी अभिनेता अजिंक्य ननावरे (ajinkya nanavre)याला डेट करत आहे. सध्या अजिंक्य सातव्या मुलीचा सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे. अजिंक्य आणि शिवानी २०१६ पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याविषयी त्यांनी २०१७ मध्ये घरातल्यांना सांगितलं होतं. मात्र, या नात्याला दोघांच्याही घरातल्यांनी विरोध केला. परंतु, लॉकडाउनच्या काळात त्यांचा हा विरोध होकारामध्ये बदलला असं शिवानीने सांगितलं.

'तुझ्या आणि अजिंक्यच्या नात्याबद्दल काय सांगशील? कोणी कोणाला प्रपोज केलं?' असा प्रश्न सुलेखा तळवलकर यांनी शिवानीला विचारला.त्यावर तिने तिची लव्हस्टोरी सांगितली.

"खरंतर आमच्यात कोणीच कोणाला अजूनही प्रपोज केलेलं नाही. पण, आजपर्यंत आम्ही एकत्र आहोत. यात पण एक गंमत आहे ती म्हणजे २०१५-१६ मध्ये आम्ही डेट करायला लागलो आणि २०१७ मध्ये लगेच आम्ही आमच्या घरीही सांगून टाकलं. मी माझ्या आईला सांगितलं आणि त्याने त्याच्या आई, आजीला.पण, दोघांच्याही घरातून ठळक विरोध आला. घरातल्यांचं असं मत होतं की, हे प्रेम वगैरे काही नाहीये हे फक्त एक अॅट्रॅक्शन आहे. जर तुम्ही खरंच सिरीअस असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा तर एकत्र राहून दाखवा", असं शिवानी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "घरातल्यांनी एकत्र राहून दाखवायला सांगितलं आणि आम्ही आतपर्यंत एकत्र आहोत. लॉकडाऊनमध्ये खरं तर त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. त्याचे बाबाही म्हणाले, तुम्ही लॉकडाऊनमध्ये भांडण न करता एकत्र राहिलात म्हणजे यापुढेही राहू शकता. त्यामुळे जवळपास ४ वर्षानंतर आमच्या घरातले तयार झाले."

दरम्यान, २०१५ मध्ये अजिंक्य आणि शिवानी यांची पहिली भेट झाला. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत या दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

टॅग्स :शिवानी सुर्वेसेलिब्रिटीमराठी अभिनेतासिनेमाटेलिव्हिजन