Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Death: "प्रचंड धक्का बसलाय...", उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुखचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:56 IST

Ajit Pawar Death: अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत आर्त भावना व्यक्त केली आहे. 

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला लोकनेता आपल्यातून निघून गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. विविध क्षेत्रातून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत आर्त भावना व्यक्त केली आहे. 

वडील विलासराव देशमुख आणि अजित पवार यांचा एक जुना फोटो ट्वीट करत रितेश देशमुखने लिहिले, "अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून मला प्रचंड धक्का बसला असून माझे मन सुन्न झाले आहे. महाराष्ट्राचे अत्यंत धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कामात कोणतीच कसर त्यांना मान्य नसायची. आपल्या सहकाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी ते त्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असत."

तो पुढे लिहितो, "स्पष्टवक्तेपणा आणि अफाट बुद्धीचातुर्य हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांच्यावर प्रेम होतं. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मला अनेकदा त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य लाभले. त्यांनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला, तो माझ्या कायम स्मरणात राहील. पवार कुटुंबीय, त्यांचे सर्व आप्तेष्ट आणि लाखो समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

कलाविश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवारांच्या अशा अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish Deshmukh deeply shocked by sudden demise of Ajit Pawar.

Web Summary : Actor Riteish Deshmukh expressed profound shock over Ajit Pawar's sudden demise, remembering him as a dynamic leader with zero tolerance for non-performance. Deshmukh shared an old photo, highlighting Pawar's encouragement and the void his passing leaves in Maharashtra's political and social spheres. He extended condolences to Pawar's family and supporters.
टॅग्स :रितेश देशमुखअजित पवारमहाराष्ट्रमराठी अभिनेताविमान दुर्घटनाबारामतीमृत्यू