Join us
Daily Top 2Weekly Top 5

"उरल्या सगळ्या आठवणी…"; अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:40 IST

अजित पवार यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी कलाकारांनी भावुक पोस्ट लिहून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. अशातच मराठी कलाकारांनीही अजित पवार यांच्या निधनाविषयी भावुक पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

आदेश बांदेकरने पोस्ट लिहिली आहे की, दादा, तुमचा स्पष्टवक्तेपणा,तुमचा वक्तशीर बाणा,तुमचा दिलदार स्वभाव , तुम्ही केलेली माझी निरागस मस्करी … हे क्षण आणि आठवणी कायम स्मरणात राहतील… उरल्या सगळ्या आठवणी… भावपूर्ण श्रद्धांजली.

अभिनेते हृषिकेश जोशींनी पोस्ट करुन लिहिलंय की, ''दैव जाणिले कुणी! दादा… वाईट झालं हे.. धक्कादायक...''

गायिका बेला शिंदेने पोस्ट करुन लिहिलंय की, ''विश्वास बसणं केवळ अशक्य! #ajitpawar #अजितदादापवार #RIP''स्वप्नील जोशीने लिहिलंय की, ''आदरणीय अजित दादा, भावपूर्ण श्रद्धांजली! महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचं स्थान वेगळं आणि उठून दिसणारं होतं…कायम राहील... तुमचं साधेपण, काम करण्याची तुमची तळमळ, मनाला भिडणारी होती. सामान्य माणसाशी त्त्यांना आपलं करून संवाद साधण्याचं तुमचं कसब खरोखरच दुर्मिळ होतं. तुमची ऊर्जा आणि तुमचं व्यक्तिमत्त्व कायम प्रेरणा देत राहील.''

''माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार  महाराष्ट्राचे हक्काचे दादा.. तुमच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण राहील. तुमचं असं जाणं मनाला चटका लावून गेलं. आज घरातलं कुणीतरी गेलं असं वाटतय..आम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हे स्वीकारण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. तुमच्या बरोबर ह्या अपघातात जे गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.''

याशिवाय अभिनेत्री शुभांगी गोखले, अभिनेत्री मेघा धाडे यांनीही अजित पवार यांचा फोटो पोस्ट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज सकाळच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र या दुःखद बातमीमुळे शोकाकुल झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's sudden demise: Marathi artists pay tribute

Web Summary : Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar passed away in an accident, prompting condolences from political figures and the public. Marathi artists expressed their grief through heartfelt social media posts, mourning the loss and its impact on the film industry.
टॅग्स :अजित पवारविमान दुर्घटनामहाराष्ट्रबॉलिवूड