अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये तुम्ही अभिनेत्री दिप्ती भागवतला पाहिलं असेल. दिप्ती हा मराठी सिनेइंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतानाही दिप्ती दिसते. तसेच अनेक इव्हेंटलाही दिप्ती हजेरी लावते. नुकतंच 'दशावतार' या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमाचा प्रीमियर पार पडला. यावेळी दिप्ती भागवतही हजर होती.
दिप्तीने लेकीसह 'दशावतार' सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. प्रीमियरमधील तिचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिप्ती तिच्या लेकीसह माध्यमांना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिप्तीकडे बघून तिच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण जात आहे. अभिनेत्री अजूनही तितकीच फिट आणि सुंदर दिसते. तिला एक मुलगी आहे यावर विश्वास ठेवणं चाहत्यांना कठीण जात आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनेत्रीला संतूर मॉमची उपमा दिली आहे.
दिप्तीच्या लेकीचं नाव जुई असं आहे. आईप्रमाणेच जुईनेही अभिनयात पाऊल ठेवलं आहे. 'लाइक आणि सबस्क्राइब' या सिनेमातून जुईने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर केदार शिंदेंच्या 'झापुक झुपूक' सिनेमातही जुई दिसली होती. जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.