Join us

"सिनेमा पाहिल्यानंतर मी पूर्णपणे हललो...", 'दशावतार' चित्रपटाबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 18:03 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कुटुंबासहित 'दशावतार' सिनेमा पाहिला. त्यांनीदेखील 'दशावतार' सिनेमाचं कौतुक केलं. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी 'दशावतार' सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

Dashavatar: 'दशावतार' सिनेमाची भुरळ प्रेक्षकांना थिएटरपर्यंत घेऊन येण्यास भाग पडत आहे. या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे आणि प्रेक्षकांकडून कौतुकही होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कुटुंबासहित 'दशावतार' सिनेमा पाहिला. त्यांनीदेखील 'दशावतार' सिनेमाचं कौतुक केलं. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी 'दशावतार' सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले, 'दशावतार' हा एक आपल्या मातीशी जोडलेला सिनेमा आहे. सिनेमा बघितल्यानंतर अक्षरश: हलायला होतं. कारण, चित्रपट पाहिल्यानंतर या सिनेमात जे दाखवलंय ते खरोखर आपल्या अवतीभोवती होतंय हे जाणवतं. एक सिनेमा म्हणून अफलातून आहेच. कलाकारांनी  काम केलंय त्याला शब्द नाहीत. पण, सिनेमाची कथी फक्त पुस्तकातील कथा नाही. खरोखर अवतीभोवती पाहा, आणि असेच पेटून उठा...हीच मशाल आणि ज्वलंत आग आपल्या महाराष्ट्राला आणि मातीला वाचवू शकते. 

दरम्यान, 'दशावतार' सिनेमात  'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात त्यांनी दशावतारी कलाकार बाबुलीची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनील तावडे, आरती वाबगावकर अशी 'दशावतार'ची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेसिनेमादिलीप प्रभावळकर