Join us
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीला दुमदुमणार हरीनामाचा 'डंका', अनोखी कहाणी असलेल्या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 14:09 IST

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अनिकेत विश्वासरावचा नवीन सिनेमा लोकांच्या भेटीला येणार आहे (danka, aniket vishwasrao)

सर्वांना आषाढी एकादशीची उत्सुकता आहे. पुढील काही दिवसांमध्ये आषाढी एकादशी साजरी होणार आहे. आषाढीनिमित्त पंढरपूरमधील विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला रवाना झाले आहेत. अशातच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. हा सिनेमा म्हणजे 'डंका'. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'डंका' सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

'डंका' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं की, गावात विठूरायाची मूर्ती हरवलेली आहे. अशातच गावातील मूळ मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येतेय. गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेली मूर्ती पुन्हा शोधून आणायचं ठरवतो. यावेळी त्याला किती अडचणींना सामोरं जावं लागतं. याशिवाय गावातील मूळ मंदिर वाचतं का, याची रंजक कहाणी सिनेमा पाहून कळेलच. 

'डंका' सिनेमातले कलाकार आणि रिलीज डेट

'डंका' सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे,  प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार,किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहेत.  ‘डंका…हरीनामाचा’ हा सिेनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. १९ जुलैला हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची पर्वणी मिळेल यात शंका नाही.

टॅग्स :अनिकेत विश्वासरावरसिका सुनिलअविनाश नारकरमराठी चित्रपट