Join us

'बिग बॉस'नंतर किशोरी शहाणे झळकणार हिंदीत, पहिल्यांदाच साकारली ग्रे शेड भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 07:15 IST

Chargesheet Webseries : किशोरी शहाणे पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहेत.

बिग बॉस मराठी सीजन २ नंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री किशोरी शहाणे विज आता 'चार्जशीट' या हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या वेबसीरिजचा टीझर सोशल मीडियावर लाॅन्च करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच १ जानेवारीला ही वेबसीरिज रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

'चार्जशीट' या वेबसीरिजच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना एक हटके सरप्राइज देणार आहे. यात त्यांनी गायत्री दीक्षित नामक स्त्रीची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या निमित्ताने किशोरीजी पहिल्यांदाच ग्रे शेड भूमिका करताना आपल्याला दिसून येणार आहेत. 

किशोरी यांची अभिनय कारकीर्द मोठी असून, त्यांच्या अभिनयकौशल्याच्या विविध छटा प्रेक्षकांनी अनुभवल्या आहेत.

परंतु, या वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

"चार्जशीट' मध्ये मी एका उच्च मराठी घराण्यातील महत्वाकांक्षी स्त्रीची भूमिका साकारत आहे. ह्या भूमिकेला वेगवेगळे पैलू आहेत, जे टप्प्यांटप्प्यांमध्ये उलगडत जातात. कथेचा सार मर्डर मिस्ट्री असल्याकारणामुळे, त्याचे गूढ मी इथे सांगणार नाही, पण मी साकारलेली गायत्री प्रेक्षकांना आवडेल अशी मी अपेक्षा करते", असे त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले.

टॅग्स :बिग बॉस मराठीकिशोरी शहाणेवेबसीरिज