अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. भूषणला आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. भूषण दरवर्षी त्याच्या घरी गणेशोत्सव साजरा करतो. भूषणच्या घरी अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. अशातच भूषण यंदा त्याच्या घरी शेवटचा गणेशोत्सव साजरा करतोय. भूषणने निरोपाची आरती करत बाप्पाला मनोभावे निरोप दिला आहे. जाणून घ्या सविस्तरभूषणच्या घरी गणेशोत्सवाचं शेवटचं वर्ष?
भूषण प्रधानने बाप्पाच्या निरोपाची आरती करुन सोशल मीडियावर बाप्पाला निरोप दिला. भूषणच्या मुंबईतील घरी यंदा गणेशोत्सवाचं शेवटचं वर्ष असल्याचं बोललं जातंय. म्हणजेच पुढच्या वर्षी भूषणच्या नवीन घरी बाप्पाचं आगमन होणार आहे. आता भूषणचं नवीन घर मुंबईतच आहे की गावी याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. भूषण प्रधानचे 'जुनं फर्निचर' आणि 'घरत गणपती' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. त्यामुळे भूषणने थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला. भूषणने सध्या राहत असलेल्या घरात शेवटचा गणेशोत्सव साजरा केल्याने तो निश्चितच भावुक झाला असेल, यात शंका नाही.
भूषण प्रधानने पुढील वर्षी गणपती कोणत्या घरी असणार, याविषयी अधिकृत माहिती अजून सर्वांना सांगितली नाही. भूषणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा 'घरत गणपती' हा सिनेमा थिएटरमध्ये गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर पुन्हा रिलीज झाला. भूषणच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सध्या कोणतीही नवी माहिती उपलब्ध नाही. भूषण सध्या अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे, असं बोललं जातंय. दोघांनी एकत्र 'जुनं फर्निचर' सिनेमात काम केलंय.