Join us

कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:22 IST

समाजातील विविध मुद्द्यांवर तो अगदी बिनधास्तपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. आस्तादने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आस्ताद काळे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आस्ताद अभिनयासोबतच त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. समाजातील विविध मुद्द्यांवर तो अगदी बिनधास्तपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. आस्तादने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या गाडीबाबत तक्रार केली आहे. 

आस्ताद व्हिडीओत म्हणतो, "ही जी गाडी दिसतेय मारुती सुझुकी XL6 नंबर आहे MH48DD8980... हा एक्सप्रेस हायवेवर अतिशय रफ गाडी चालवत आहे. त्याच्या गाडीत एक भगवा झेंडा आहे. तो शिंदे सेनेचा आहे की शिवसेनेचा हे मला माहीत नाही. तेवढं नीट बघता आलं नाही. पण अतिशय मग्रुरीने त्याचं सगळं वर्तन रस्त्यावर चालू आहे. ही गाडी कोणाची आहे याची माहिती जर मिळाली तर कृपया मला कळवा. याने आता माझ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात डावीकडून कट मारलाच आहे. आणि त्यानंतर दोन गाड्यांनागी डेंजर पद्धतीने कट मारलाय. याची कोणाला माहिती असेल तर कृपा करुन कळवा". 

"दोन महत्वाच्या गोष्टी:- १) हे चित्रण करताना मी गाडी चालवत नव्हतो. माझा सारथी गाडी चालवत होता. २) गाडीमधे लावलेला झेंडा हा राजकीय ओळख असलेलाच होता. ती नेमकी कुठली ते कळलं नाही", असं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलं आहे. त्यासोबतच त्याने आरटीओ मुंबई, मुंबई पोलीस यांनाही टॅग केलं आहे.  त्याच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :अस्ताद काळेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता