अशोक सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. अशोक सराफ यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अशोक आता ७८ वर्षांचे आहेत. तरीही ते सळसळत्या एनर्जीने काम करत आहेत. अशोकमामा महाराष्ट्रातील अनेक शहरात या वयातही नाटकाचे प्रयोग करताना दिसतात. अशातच अशोकमामा त्यांच्या तब्येतीचीही काळजी घेताना दिसतात. पण एकदा अशोक सराफ यांच्या आयुष्यात अशी घटना घडली जेव्हा त्यांना चांगलाच त्रास झाला होता. काय झालेलं नेमकं?
मी जास्त मीठ खाल्लं अन्...
अशोक सराफ यांनी अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. अशोक सराफ म्हणाले, "आमच्या व्हॅक्यूम क्लिनर नाटकाचा शो होता रत्नागिरीला. तेव्हा आम्ही सगळे दुपारी जेवायला गेलो. त्यावेळी खारावलेले मासे असतात ना, सुके मासे ते खाल्ले. त्या माश्यांवर मीठ कमी असतं. त्यामुळे त्यांनी मीठाची कोशिंबीर दिली होती. ती मला खूप आवडली. म्हणून मी आणखी एक घेतली. आता कोशिंबीर ही कोशिंबीरीसारखीच खायची असते. मी ती भाजीसारखी खाल्ली. त्यावेळी काय झालं नाही. पण रात्री नाटकाचा एक अंक झाला आणि मी हलायला लागलो."
"एक अख्खा पुढचा अंक मी तशाच अवस्थेत केलाय. रात्री तिकडचे मोठे डॉक्टर्स आले होते. ते मला घेऊन गेले. चक्कर येते होती, नीट सरळ चालता येत नव्हतं. मग ते मला त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बीपी वाढलं म्हणाले. मी जे मीठ खाल्लं आणि खारावलेला मासा. तर मीठ हे अत्यंत घातक आहे. माझं बीपी शूट झालं. किती? तुम्हाला विश्वास नाही बसणार. २०० बीपी होतं. त्यात मी अख्खा एक अंक केलंय. एक वाक्य न विसरता, एक pause न सोडता, एक गॅप घेतली नाही, एन्ट्री - एक्झिट व्यवस्थित. मग त्यांनी मला एक गोळी दिली. घेतली गोळी आणि झोपलो. सकाळी उठलो फ्रेश. रात्री पुन्हा प्रयोग केला."