Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आशाताईंना राजा शिवाजी पाहण्याची इच्छा होती, पण.."; रितेश देशमुखने सांगितली भावुक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:02 IST

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. अशातच रितेश देशमुख 'राजा शिवाजी'निमित्त आशाताईंकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल बोलताना बोलताना भावुक झाला

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. अशातच रितेश देशमुख 'राजा शिवाजी'निमित्त आशाताईंकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल बोलताना बोलताना भावुक झाला. रितेशने असंही सांगितलं की 'राजा शिवाजी' सिनेमा आशाताईंना पाहायचा होता.  

रितेश म्हणाला, "जेव्हा त्या मला भेटल्या, तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, जसा एक आई आपल्या मुलावरून फिरवते. मी त्यांना 'आशा आई' म्हणूनच हाक मारतो आणि आजही त्याच नावाने ओळखतो. गप्पांच्या ओघात त्यांनी मला विचारले की, तुला काय खायला आवडते? मी जे सांगितले, तेच पदार्थ त्यांनी स्वतःच्या हाताने बनवले आणि मला घरी जेवायला बोलावले. मी तिथे गेलो, आम्ही एकत्र जेवण केले आणि खूप गप्पा मारल्या".

'राजा शिवाजी' पाहण्याची अपूर्ण इच्छा आपल्या आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल बोलताना रितेश भावुक झाला. त्याने आशाताईंसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची आठवण करून दिली. आशा ताईंनी रितेशला फोन करून म्हटले होते की, "माझा तुला आशीर्वाद आहे, तू खूप चांगला चित्रपट बनव. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा मला तो पाहायचा आहे. पण आता दुर्दैवाने 'आशा आई' हा चित्रपट पाहू शकणार नाहीत", असं रितेशने सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle wanted to see 'Raja Shivaji', but...

Web Summary : Ritesh Deshmukh shared a touching memory of Asha Bhosle's affection and her desire to watch his film 'Raja Shivaji'. He fondly remembers her motherly love and delicious meals she cooked for him. Sadly, she won't be able to see the film.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटआशा भोसलेरितेश देशमुखबॉलिवूडमराठी चित्रपट