Join us

Video: 'या' ठिकाणी एकमेकांच्या प्रेमात पडले होते दिपा-अंकुश; पहिल्यांदाच दाखवलं त्यांच्या भेटीचं ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:55 IST

Dipa-Ankush: अंकुश-दिपाने पुन्हा जाग्या केल्या प्रेमाच्या आठवणी; व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अंकुश चौधरी (ankush chaudhari) आणि दिपा परब-चौधरी (deepa parab-chaudhari). या जोडीची लव्हस्टोरी साऱ्यांनाच ठावूक आहे. लग्नापूर्वी या जोडीने जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या जोडीच्या लग्नाला १५ वर्ष झाली असून नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांची पहिली भेट कुठे झाली होती हे सांगितलं आहे.

दिपा आणि अंकुश यांची लव्हस्टोरी कलाविश्वासह चाहत्यांना सुद्धा माहित आहे. मात्र, ते नेमकं पहिल्यांदा कुठे भेटले होते हे कोणाला माहित नाही. त्यामुळेच अंकुशने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या भेटीचं पहिलं ठिकाण चाहत्यांना दाखवलं आहे.

या ठिकाणी पहिल्यांदा भेटले दिपा-अंकुश

अंकुश आणि दिपा हे दोघंही महर्षी दयानंद कॉलेज अर्थात एमडी कॉलेजचे विद्यार्थी. त्यामुळे सहाजिकच ते पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटले. मात्र, या कॉलेजमध्येही अशी एक जागा आहे जी दिपा-अंकुशसाठी खास होती. या ठिकाणी ते बराच वेळ गप्पा मारत बसायचे. 

अंकुशने व्हिडीओ शेअर करत दाखवली जागा

 “आम्ही एमडी कॉलेजला आलोय, खूप वर्षांनंतर. 1993 ला आम्ही इथे शिकायला होतो. ही ती जागा, हा तो कट्टा. याच कट्ट्यावर आम्ही टाईमपास करत बसलेलो असायचो. खूप छान वाटतंय”, असं म्हणत अंकुशने हा व्हिडीओ शेअर केला.दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत “College Days! जुन्या आठवणींना उजाळा..!” असं कॅप्शनदेखील त्यांनी दिलं आहे. 

टॅग्स :अंकुश चौधरीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजनमराठी अभिनेता