Ajit Pawar Death: आजचा दिवस उजाडला तो एका दु:खद बातमीने. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात अकाली निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी येताच संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या अशा जाण्याने संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
अजित पवारांनी कायम सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीला देखील धक्का बसला आहे.अशातच मराठी अभिनेताप्रथमेश परबने अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. या पोस्टमघ्ये अभिनेत्याने लिहिलंय, "ही बातमी स्वीकारणं खूप कठीण आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने मन अत्यंत व्यथित आणि शोकाकुल झालं आहे.नेहमी वेळेचे काटेकोर पालन करणारे, शिस्तप्रिय, कामात अत्यंत चोख आणि तरीही विनोदबुद्धीने भरलेले व्यक्तिमत्त्व. निर्भीड, खुले विचारांचे वक्ते, जे प्रत्येकाशी मनापासून जोडले जायचे.काही व्यक्ती जात नाहीत. त्या काळात विरून जातात, आठवणींमध्ये राहतात."
यापुढे प्रथमेशने म्हटलंय,"आज मन सुन्न आहे, शब्द अपुरे आहेत.तुमचा आवाज, तुमचं हसणं, कामातली शिस्त आणि निर्भीडपणा...... सगळं डोळ्यांसमोरून जात आहे.विश्वास बसत नाही, पण आठवणी मात्र खोलवर रुतून बसल्या आहेत. मन भरून आलं आहे.भावपूर्ण श्रद्धांजली दादा...". अशी पोस्ट शेअर करत प्रशमेशने शोक व्यक्त केला आहे.
Web Summary : Actor Prathamesh Parab mourns the untimely demise of Maharashtra's Deputy Chief Minister Ajit Pawar in a plane crash. Parab remembers Pawar's discipline, humor, and open-mindedness, expressing disbelief and sorrow at the news. He acknowledges Pawar's impact and fondly recalls his memories.
Web Summary : अभिनेता प्रथमेश परब ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार के विमान दुर्घटना में असामयिक निधन पर शोक व्यक्त किया। परब ने पवार की अनुशासन, हास्य और खुले विचारों को याद करते हुए इस खबर पर अविश्वास और दुख व्यक्त किया। उन्होंने पवार के प्रभाव को स्वीकार किया और उनकी यादों को स्नेहपूर्वक याद किया।