Join us

Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:47 IST

Riteish Deshmukh on Ahmedabad Plane Crash: अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी कळताच रितेश देशमुखला धक्का बसला आहे.

Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबाद एअरपोर्टवरुन लंडनच्या दिशेने झेपावलेल्या एअर इंडियाचे विमानाचा भीषण अपघात झाला आहे. एअरपोर्टवरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच विमान कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या विमानात एकूण १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. या दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी कळताच रितेश देशमुखला धक्का बसला आहे. त्याने याबाबत ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. "अहमदाबाद विमान अपघाताची दुर्घटना समजताच मला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. या अपघातामुळे ज्या प्रवाश्यांवर, ज्या कुटुंबावर आणि तिथे असलेल्या ज्या लोकांवर परिणाम झाला, त्या सर्वांप्रती मी दुःख व्यक्त करतो. या कठीण काळात माझ्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत", असं रितेशने म्हटलं आहे. 

"ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केली हळहळ.

एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होते.  विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागात कोसळले. ज्या भागात एअर इंडियाचे विमान कोसळले, ते मेघानीनगर विमानतळापासून १५ किमी दूर आहे. अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते. अग्निशामक दलाचे अधिकारी जयेश खडिया यांनी सांगितले की, दुर्घटना घडल्यानंतर विमानाला मोठी आग लागली. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निबंब पाठवण्यात आले आहेत. 

टॅग्स :अहमदाबादगुजरातविमान दुर्घटनाएअर इंडियाअपघातरितेश देशमुख