Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तू बाबांच्या कथेला पूर्ण न्याय दिलास.."; 'फुलवंती' पाहून बाबासाहेब पुरंदरेंच्या मुलाने केलं प्राजक्ताचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 11:19 IST

प्राजक्ता माळीने संपूर्ण कुटुंबासोबत 'फुलवंती' सिनेमा पाहिला. त्यावेळी प्राजक्ताच्या कुटुंबाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (prajakta mali, phullwanti)

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सध्या प्राजक्ता माळी चांगलीच चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे 'फुलवंती'. सध्या प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा लोकांच्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. प्राजक्ता माळीने उत्कृष्ट अभिनय आणि नृत्याच्या जोरावर 'फुलवंती' सिनेमामध्ये प्रशंसनीय काम केलंय. नुकतंच प्राजक्ताने सोशल मीडियावर तिने सहकुटुंब 'फुलवंती'चा आस्वाद घेतल्याचं सांगितलंय.

प्राजक्ताने सहपरिवार पाहिला 'फुलवंती'

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. यात तिची संपूर्ण फॅमिली आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा मुलगा आणि अभिनेते प्रसाद पुरंदरे सहभागी होते. प्राजक्ता पोस्ट करुन लिहिते की, "प्रसाद पुरंदरेंनी ‘सकल ललित कलाघर’ (पुणे) मध्ये फुलवंतीचा #specialshow आयोजित केला. संपुर्ण कुटूंबाबरोबर परत चित्रपट पहायचाच होता… सगळे घरचे जमले. पहिल्यांदा निव्वळ प्रेक्षक म्हणून चित्रपट पाहू शकले."

पुढे प्रसाद पुरंदरे प्राजक्ताचं कौतुक करताना म्हणाले की, "आज बाबा असायला हवे होते, त्यांना फार आनंद झाला असता. तू बाबांच्या कथेला पूर्ण न्याय दिलास.” अशाप्रकारे प्रसाद यांनी प्राजक्ताचं कौतुक केलं. प्राजक्ताला हे कौतुक ऐकून खूप बरं वाटलं असं ती म्हणाली. प्राजक्ताने पुण्याला हा विशेष शो आयोजित करुन कुटुंबासोबत हा सिनेमा पाहिला. दरम्यान प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा amazon prime video या ओटीटीवर सध्या रेंटचे पैसे भरुन घरबसल्या बघता येईल.

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी चित्रपट