Join us
Daily Top 2Weekly Top 5

Adinath Kothare : तुझी लेक प्रेमात पडेल तेव्हा काय करशील? आदिनाथ म्हणतो, 'आजकालची मुलं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 15:24 IST

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांना जिजा ही लेक आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) उत्तम अभिनेता तर आहेच पण तितकाच हळवा बापही आहे. लेक जिजावरचं त्याचं प्रेम त्याने नेहमीच व्यक्त केलंय. नुकतंच त्याने प्लॅनेट मराठीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याने आयुष्यातील अनेक प्रसंग शेअर केले. लेक जिजा सोबत त्याचं बॉंडिंग कसं आहे हे देखील त्याने मुलाखतीत सांगितलं.

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांना जिजा (Jizah) ही लेक आहे. 2018 मध्ये उर्मिलाने (Urmila Kothare) लेकीला जन्म दिला. जिजा आता ५ वर्षांची झाली आहे. पुढे १४-१५ वर्षांनी जेव्हा जिजा प्रेमात पडेल तेव्हा तुझी काय रिअॅक्शन असेल असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, '१४-१५ वर्ष ही तुम्ही खूप बोलत आहात. आजकालची मुलं फार पटापटा मोठी होत आहेत. त्यामुळे हे लवकरच होईल असं वाटतंय. पण माझी अशी इच्छा आहे की , जेव्हा ती प्रेमात पडेल तेव्हा ती सगळ्यात आधी कोणाच्या कानात येऊन सांगेल तर ते माझ्या कानात सांगेल. असा आमचा रॅपो असावा असं मला वाटतं. मी तिच्यासोबत तितकं वेलकमिंग असावं, नव्या पिढीला समजून घेणारं असावं, माझाही दृष्टिकोन तसा असावा अशीच माझी मनापासून इच्छा आहे.'

आदिनाथ पुढे म्हणाला, 'तसंही मी तिला काही सांगण्यापेक्षा स्वत:लाच हा सल्ला देईन तू तसा हो, मी तिचा बाप तर असेनच पण मला तिचा मित्रही व्हायचंय.'

आदिनाथचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. तसंच त्याने बॉलिवूड सिनेमा '83' मध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारली.

टॅग्स :आदिनाथ कोठारेमराठी अभिनेतापरिवार