Join us

"बाहेर प्रेक्षक खोळंबले होते अन्..."; नाटकाच्या २०० व्या प्रयोगाला काय घडलं? प्रिया बापटने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:58 IST

प्रिया बापट - उमेश कामतची भूमिका असलेल्या 'जर तरची गोष्ट' नाटकाच्या प्रयोगावेळेस आलेला अनुभव प्रियाने सोशल मीडियावर शेअर केलाय (priya bapat)

प्रिया बापट (priya bapat) सध्या तिचा पती उमेक कामतसोबत 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे प्रयोग करत आहे. या नाटकातील प्रिया-उमेश (umesh kamat) यांचा परफॉर्मन्स पाहायला त्यांचे चाहते नाटकाला हाउसफुल्ल गर्दी करताना दिसत आहेत. अशातच 'जर तरची गोष्ट' नाटकाचा २०० वा प्रयोग नुकताच पार पडला. या प्रयोगाच्या वेळी प्रियाने आलेला अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले. काय घडलं नेमकं?

प्रियाने सांगितला प्रेक्षकांचा अनुभव

प्रियाने सोशल मीडियावर 'जर तरची गोष्ट'ची गोष्ट नाटकाचं नेपथ्य लावतानाचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "“जर तरची गोष्ट'चा २०० वा प्रयोग.. उत्तम प्रयोग सादर करण्यासाठी २५/३० जणांची backstage टीम नेहमीच मेहनत घेत असते. आज याच टीम मधे आमचे मॅनेजर, ड्राइव्हर काका,कलाकार सगळे तर सहभागी झालेच पण प्रेक्षकांनीही मदतीचा हात पुढे केला. आधीचा कार्यक्रम उशिरा संपल्याने आमच्या टीमला सेट उभारण्यासाठी वेळच नाही मिळाला. बाहेर प्रेक्षक खोळंबले होते."

"शेवटी नाट्यगृह स्वच्छ झाल्याक्षणी प्रेक्षकांना आत सोडलं आणि त्यांच्या साक्षीने अवघ्या २५ मिनटात अख्खा सेट उभा केला आमच्या टीमने! २०० व्या प्रयोगाला खरी रंगत आणली या सुजाण, समजुतदार आणि भन्नाट प्रेक्षकांनी. तुमच्या प्रेमामुळे हे नाटक यशस्वी झालंय. अजून खूऽऽऽऽऽप प्रयोग करायचे आहेत. असंच प्रेम असू द्या. मनोरंजन करत राहू. या प्रयोगाला या कमाऽऽल प्रेक्षकांना प्रयोगानंतर भेटू शकलो नाही याची खंत आहे. पण पुणेकर लवकरच भेटू."

टॅग्स :प्रिया बापटमराठी चित्रपटनाटकउमेश कामत