Join us

महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:12 IST

Genelia d'souza: देशमुखांच्या कुटुंबात सून म्हणून आलेली जेनेलिया या कुटुंबात छान सरमिसळून गेली आहे.

महाराष्ट्राचं लाडकं कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जेनेलिया डिसुझा (Genelia d'souza) यांच्याकडे कायम पाहिलं जातं. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून प्रत्येक कृतीमधून त्यांच्यातील संस्कार दिसून येतात. त्यामुळे या जोडीची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. विशेष म्हणजे आंतरजातीय विवाह करुन देशमुखांच्या कुटुंबात सून म्हणून आलेली जेनेलिया या कुटुंबात छान सरमिसळून गेली आहे. इतकंच नाही तर तिला महाराष्ट्रीयन गोष्टी विशेष आवडतात. यात अलिकडेच रितेशने  तिला आवडणाऱ्या महाराष्ट्रीयन पदार्थाचं नाव सांगितलं.

गेल्या वर्षी रितेश-जेनेलियाचा 'वेड' (Ved) हा पहिला मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातून रितेशने दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. तर, जेनेलियाने मराठी सिनेसृष्टीत. त्यामुळे या सिनेमाची मोठी चर्चा झाली. इतकंच नाही तर या सिनेमाने अनेक पुरस्कारही पटकावले. त्या निमित्तानेच रितेशने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने तिच्या आवडत्या महाराष्ट्रीन पदार्थाचं नाव सांगितलं.

जेनेलियाला पाणीपुरी प्रचंड आवडते. पण, लातूरला गेल्यावर ती अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थच खाते. यात तिला पिठलं-भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, भगर आणि काळ्या मसाल्याची आमटी प्रचंड आवडते, असं रितेशने सांगितलं.

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुखवेड चित्रपटसिनेमासेलिब्रिटी