Join us

एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:43 IST

महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मध्ये कलाकारांची फौज, एकनाथ शिंदेंच्या लूकमधील अभिनेता कोण?

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित आणि अभिनीत 'जुनं फर्निचर' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. लेकाच्या विरोधात थेट कोर्टात जाणाऱ्या वयोवृद्ध बापाची ही कशा आहे. सिनेमात मराठी कलाकारांची फौजच आहे. भूषण प्रधान मुलाची भूमिका साकारत आहे. याशिवाय अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉ गिरीश ओक, उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे यांचीही भूमिका आहे. सिनेमातील एका अभिनेत्याचा फोटो व्हायरल होतोय ज्याचा लूक सेम टू सेम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा दिसतोय.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे आहेत. त्यांची दाढी म्हणजे त्यांची ओळखच. तशीच दाढी, चष्मा, कपाळावर टिळा अशा लूकमध्ये एक अभिनेता दिसून येतोय. प्रकरण कोर्टात जायच्या आधीच याचं मीडिया ट्रायल सुरु झालंय असा डायलॉग तो बोलताना दिसतोय. हा अभिनेता मंत्र्याच्या भूमिकेत दिसतोय. एकनाथ शिंदेंसारखाच दिसणारा हा अभिनेता कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हा अभिनेता आहे सर्वांचा लाडका मकरंद अनासपुरे (Makrand Aanaspure). मकरंद अनासपुरे सिनेमात असणं हे चाहत्यांसाठी सरप्राईजच आहे. मकरंदला या लूकमध्ये कोणीही ओळखू शकलेलं नाही.

नेहमी विनोदी अंदाजात दिसणारा मकरंद अनासपुरे यामध्ये गंभीर भूमिकेत दिसतोय. छोट्या भूमिकेतूनही त्याने प्रेक्षकांचं जिंकलं आहे. महेश मांजरेकरांनी सिनेमात जुन्या-नवीन कलाकारांची फौजच घेतल्याचं पाहायला मिळतंय. कालच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळतोय. 

टॅग्स :मकरंद अनासपुरेमराठी अभिनेताएकनाथ शिंदेमराठी चित्रपट