Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिच्यासारखी तिच..; रंजनाविषयी अशोक सराफ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 18:28 IST

Ashok Saraf: एका मुलाखतीत त्यांनी रंजनाविषयी भाष्य केलं

मराठी कलाविश्वातील विनोदाचा बादशाह म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf). कधी नायक,कधी खलनायिक तर कधी विनोदी भूमिका साकारुन अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. अशोक सराफ विनोदाचं अचूक टायमिंग साधत असल्यामुळे त्यांचे अनेक संवाद, सीन लोकप्रिय आहेत. मात्र, प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याला विनोदाच्या बाबतीत एक अभिनेत्री त्यांच्या वरचढ असल्यासारखी वाटते. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं होतं.

आपल्या दर्जेदार अभिनयामुळे चित्रपटसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख (Ranjana Deshmukh). अशोक सराफ आणि रंजना यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. त्याकाळी त्यांची जोडी सुपरहिट होती. विशेष म्हणजे याच रंजना विनोदाच्या बाबतीत आपल्यावर मात करायच्या असं मत अशोक सराफ यांचं होतं.

‘रंजनाने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं त्यावेळी तिने विनोदी भूमिका केल्याच नाहीत. त्यामुळे नायिका म्हणून तिला प्रसिद्धी मिळाली. पण, तिने माझ्यासोबत अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. त्यावेळी तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक झालं. विनोदाच्या बाबतीत ती माझ्यापेक्षाही वरचढ ठरत होती. त्यामुळे ‘विनोदात रंजना अशोकला भारी पडते’ असेही बोलले जायचे, असं अशोक सराफ म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "हे ऐकून मलाही माझ्या या मैत्रिणीचं खूप कौतुक वाटायचं कारण त्यावेळी ती एक अभिनेत्री म्हणून उत्तम आहे यावर माझा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे ती माझ्यापेक्षा सरस ठरतीये यायचा मला आनंदच होता. रंजना व्यतिरिक्त मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं पण तिच्यासारखी दुसरी अभिनेत्री कोणीच नाही, तिच्यासारखी तीच’. "

दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी रंजनाचा अभिनय विशेष आवडायचा असंही सांगितलं.   'बिनकामाचा नवरा' या चित्रपटात रंजना आणि अशोक सराफ यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्याकाळी हा सिनेमा कमालीचा गाजला होता.

टॅग्स :अशोक सराफसेलिब्रिटीसिनेमा