Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवर डॅडींच्या नातीची चर्चा; अक्षयने शेअर केला लेकीचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 11:24 IST

akshay waghmare: अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये अर्ना डॅडींच्या मांडीवर खेळताना दिसत आहे

ठळक मुद्देअरुण गवळी ऊर्फ डॅडी यांच्या लेकीने चार महिन्यांपूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या नातीचे फोटो पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक होते.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर डॅडींच्या नातीची म्हणजेच अर्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेता अक्षय वाघमारेने पहिल्यांदाच त्याच्या लाडक्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अर्ना चांगलीच चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये अर्ना तिच्या आजी-आजोबा व आई-बाबांसोबत दिसून येत आहे.

अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांच्या लेकीने चार महिन्यांपूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या नातीचे फोटो पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. अखेर अक्षयने त्याच्या चिमुकलीचा फोटोंचा एक कोलाज करुन तो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्नाच्या चेहऱ्यावर गोड हास्य दिसत असून तिचे आजी-आजोबादेखील आनंदात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, अक्षय वाघमारे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने मे २०२० मध्ये योगिता गवळीसोबत लग्नगाठ बांधली. अक्षयने 'फत्तेशिकस्त', 'बस स्टॉप', 'दोस्तीगिरी', 'बेधडक' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  

टॅग्स :अरुण गवळीमराठीइन्स्टाग्राम