महानगरपालिका निवडणुकीत भायखळा भागातून अरुण गवळी म्हणजेच डॅडींची मुलगी योगिता गवळीचा पराभव झाला. योगिताचा नवरा आणि अभिनेता अक्षय वाघमारेने योगितासाठी खास पोस्ट लिहिली आहे. योगिताचा पराभव झाला असला तरीही पोस्टच्या माध्यमातून अक्षयने तिला धीर दिला आहे.
अक्षयने योगिताचा फोटो पोस्ट करत लिहिलंय की, ''प्रिय बायको, सर्वात आधी तुझे मनःपूर्वक आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे! Pregnancy आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई... ही सर्व जबाबदारी खांद्यावर असताना तू ज्या धैर्याने ही निवडणूक लढवलीस, ते खरंच थक्क करणारं आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष—भाजप, शिंदे गट, ठाकरे गट किंवा मनसे—कोणाही पेक्षा वैयक्तिकरित्या तुला सर्वाधिक ६३०० मतं मिळाली आहेत. तुझ्या आसपासही कोणी नाही, हे तू सिद्ध केलंस.''
''डॅडी, मम्मी, तू आणि अखिल भारतीय सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक कष्टांची ही पावती आहे. भायखळ्याच्या जनतेने तुला जे प्रेम दिलंय, ते पाहून हे स्पष्ट होतंय की लोकांसाठी तू आधीच निवडून आली आहेस. त्यांनी जातीपातीच्या राजकारणापेक्षा तुझ्या ‘कामावर’ आणि ‘विकासावर’ विश्वास दाखवला आहे.गेल्या काही महिन्यांत तू घेतलेले कष्ट आणि तुला होणाऱ्या वेदना मी खूप जवळून पाहिल्या आहेत. मोठी मुलगी आणि आत्ताच जन्मलेलं आपलं बाळ...''
''या दोघींना सोडून तू रोज १२-१२ तास काम करायचीस. दिवसातून एकदाही त्यांना भेटता येत नव्हतं, तरीही फोनवरून तुझी त्यांच्याबद्दलची काळजी आणि तुझ्यातली ती हळवी ‘आई’ मी सतत अनुभवत होतो. तुला शारीरिक वेदना होत होत्या, पण तू कधीच तक्रार केली नाहीस की कोणावर चिडली नाहीस. तुझा तो शांत आणि संयमी स्वभाव हीच तुझी खरी ताकद आहे.''''एक गोष्ट लक्षात ठेव, जर सर्व पक्ष स्वतंत्र लढले असते, तर मतांच्या बाबतीत तुझ्या जवळपास ही कोणी नव्हत.लोकांनी तुझ्यावर आणि डॅडींच्या कर्तृत्वावर मोहोर उमटवली आहे. हा तुझा पराभव नक्कीच नाही, तर ही तुझी राजकारणातली एक ‘धमाकेदार एंट्री’ आहे! मला तुझा खूप अभिमान वाटतो, बाळा. आता अधिक जिद्दीने कामाला लागूया.Love you always!''
Web Summary : Actor Akshay Waghmare posted a heartfelt message for his wife, Yogita Gawli, after her defeat in the municipal elections. He praised her courage and dedication, highlighting the significant number of votes she received despite challenges. He sees this as a strong entry into politics.
Web Summary : नगरपालिका चुनाव में पत्नी की हार के बाद अभिनेता अक्षय वाघमारे ने योगिता गावळी के लिए एक हार्दिक संदेश पोस्ट किया। उन्होंने चुनौतियों के बावजूद मिले वोटों की संख्या पर प्रकाश डालते हुए उनके साहस और समर्पण की सराहना की। वह इसे राजनीति में एक मजबूत प्रवेश मानते हैं।