Join us

‘तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...' फॅंड्रीतील शालू- जब्याची ग्रेट भेट; व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:13 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.

Marathi Cinema Fandry : मराठी सिनेइंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांनी  प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करत त्यांच्या मनाचा ठाव घेतला. असाच एक चित्रपट ज्याचं नाव मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं गेलंय. हा सिनेमा म्हणजे 'फॅंड्री'. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होऊन तब्बल ११ वर्ष उलटली. नागरांज मंजुळे दिग्दर्शित 'फॅंड्री' सिनेमाबरोबरच त्यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. मोठ्या पडद्यावर कमाईचे विक्रम  रचत हा सिनेमा प्रचंड गाजला होता.

पण या चित्रपटातील शालू आणि जब्याची भूमिका साकारणारे कलाकार तुम्हाला आठवतायत का? अभिनेता सोमनाथ अवघाडे आणि राजेश्वरी खरात या नवख्या कलाकारांनी या भूमिका वठवल्या. सध्या शालू आणि जब्यामध्ये वाढत्या वयानूसार जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं पाहायला मिळतंय. 

अभिनेत्री राजेश्वरी खरातने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सोमनाथ आणि तिचा फोटो चाहत्यासोंबत शेअर केलाय. 'कशी काय मग जोडी' असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केलाय. शिवाय शालू जब्या फॉरेव्हर असा हॅशटग देऊन राजेश्वरीने चाहत्यांच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 

शालू आणि जब्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स तसेच कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे. 'लग्न करून टाका मग मस्त आहे जोडी’, ‘काळी चिमणी घावली जब्याला’, ‘फँड्रीचा सिक्वेल यायला पाहिजे’, ‘नागराज सरने बनादी जोडी’, ‘तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांमनी त्यांच्या या व्हायरल फोटोवर केल्या आहेत. 

टॅग्स :नागराज मंजुळेराजेश्वरी खरातमराठी चित्रपटसेलिब्रिटी