Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी बिग बॉसच्या घरात मयुरी देशमुखची एंट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 11:05 IST

मराठी बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांची चर्चा कायमच रंगते. यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी चेहरे झळकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.

छोट्या पडद्यावरील मराठी 'बिग बॉस पर्व -2'  हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. प्रत्येक सिझनमध्ये घरातील स्पर्धकांमधील वाद यामुळे बिग बॉसची चर्चा जोरात रंगते. तसेच  यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी चेहरे झळकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. या शोच्या दुसऱ्या सीझनबाबत 'कलर्स' मराठी वाहिनीने घोषणा केल्यापासून या शोमध्ये कोणाची कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता सा-यांना आहे. 

'खुलता कळी खुळेना' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख 'मराठी बिग बॉस-2' मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. याविषयी मयुरीने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नसली तरीही तिला बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वासाठी विचारणा झाल्याचं समजतंय. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेत मयुरीने साकारालेली सरळ साध्या स्वभावाची मानसीला सा-यांची पसंती मिळाली होती. त्यामुळे बिग बॉस शोमध्ये तिचा निराळा अंदाज पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनाही नक्कीच उत्सुकता असणार.

बिग बॉस मराठीच्या प्रोमोजमधून महेश मांजरेकर वेगवेगळ्या अंदाजमध्ये प्रेक्षकांसमोर आले. आता जर असे विविध क्षेत्रातील कलाकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य म्हणून आले तर काय होईल हे बघणे रंजक असणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या नावाचीदेखील चर्चा होती. मात्र याबाबत खुद्द तिनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे. तिने इंस्टाग्रामवर सांगितले की, बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहण्याची आता वेळ जवळ आली आहे. मला बिग बॉस पहायला आवडते आणि मी दुसरा सीझन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही. ही अफवा आहे. मोठ्या काळ चालणाऱ्या कार्यक्रमात यावर्षी सहभागी होण्याचा विचार नाही. या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना व संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. 

 

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर केतकी माटेगावकर