Join us

थाटामाटात पार पडला अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा!होणार 'या' राजकीय कुटुंबाची सून, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 08:56 IST

Tejaswini Lonari Engged With Samadhan Sarvankar : मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न! 'या' नेत्याची होणार सून, फोटो व्हायरल 

Actress Tejaswini Lonari Engagement : सध्या सगळीकडे लगीनसराईचा माहोल आहे. अनेकजण आता विवाहबंधनात अडकत आहेत. सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठीसह हिंदी कलाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. तर काहींनी आपल्या नात्याची कबुली देत नव्या प्रवासाला सुरुवात केली.तसंच येत्या काळामध्ये काहीजण लग्न करणार आहेत. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नावं जोडण्यात येणार आहे. अभिनेत्री शिवानी नाईक अमित रेखी, प्राजक्ता गायकवाड-शंभूराज खुटवड यांच्यानंतर मराठीतील एक लोकप्रिय नायिका लवकरच बोहल्यावर चढणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून तेजस्विनी लोणारी आहे. 

आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नायिका तेजस्विनी लोणारीचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे.  तेजस्विनी लोणारीने आजवर अनेक मराठी चित्रपट, मालिकांमधून काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अलिकडेच तेजस्विनीचा साखरपुडा संपन्न झाला. नुकतच सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. 

'या' राजकीय घराण्याची होणार सून...

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. शिवसेना युवानेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तिने साखरपुडा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे ते सुपुत्र आहेत. या प्रसंगी अनेक मान्यवर राजकीय नेते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. दरम्यान, तेजस्विनी लोणारीने साखरपुड्याला  लाल रंगाची साडी नेसून मोकळे केस सोडले आहेत. अभिनेत्री या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. सध्या  सोशल मीडियावर अभिनेत्रीचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

वर्कफ्रंट 

तेजस्विनी लोणारीने 'छापा काटा', 'वॉण्टेड बायको नंबर वन', 'चित्तोड की राणी पद्मिनी का जोहूर', 'गुलदस्ता', 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा', 'अफलातून', 'कलावती' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.तसेच अलिकडेच ती 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेमध्ये दिसली. याशिवाय 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Tejaswini Lonari Engaged to Political Family, Photos Revealed

Web Summary : Actress Tejaswini Lonari is engaged to Shiv Sena leader Samadhan Sarvankar. Photos show the radiant bride-to-be in a red saree. Her engagement marks the start of a new chapter, celebrated with family and political figures.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया