Join us

स्काय ब्लू रंगाच्या पातळ साडीत कुलकर्ण्यांच्या सुनेचा स्वॅग; पाहा शिवानीचं नवं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 18:40 IST

Shivani rangole: यावेळीदेखील तिने ट्रान्सपरंट साडीमध्ये छानसं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

झी मराठीवरील 'शेजारी शेजारी' या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे (shivani rangole). उत्तम अभिनयाच्या जोरावर शिवानीने कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. सध्या शिवानीचा एक छानसा व्हिडीओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कलाविश्वाप्रमाणेच शिवानी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती नवनवीन फोटोशूट करुन ते चाहत्यांच्या भेटीला आणत असते. यावेळीदेखील तिने ट्रान्सपरंट साडीमध्ये छानसं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरम्यान, या फोटोशूटच्या वेळी तिने स्काय ब्लू रंगाची पातळ साडी नेसली आहे. तसंच त्यावर हलकासा मेकअप केला असून सिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. या लूकमध्ये ती अत्यंत साधी पण तितकीच ग्लॅमरस दिसत आहे. या व्हिडीओच्या बँकग्राऊंटला मोनाली ठाकूरचं 'सवारलूँ' हे गाणं सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :शिवानी रांगोळेसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन