Join us

लग्नानंतर शिवानीचा मराठमोळा ठसका; साजशृंगारातील हा व्हिडीओ एकदा जरुर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:35 IST

Shivani rangole: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शिवानीने अलिकडेच एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

'शेजारी शेजारी' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणदे शिवानी रांगोळे. काही महिन्यांपूर्वीच शिवानीने अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे ही जोडी बऱ्याचदा चर्चेत असते. यात शिवानीदेखील सोशल मीडियावर कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शिवानीने अलिकडेच एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मराठमोळ्या साजशृंगारात दिसून येत आहे. शिवानीने एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी हा साजशृंगार केल्याचं दिसून येत आहे. मात्र, तिचा हा अंदाज साऱ्यांना आवडला आहे.

दरम्यान, शिवानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने हिरव्या रंगाची छान काठपदराची साडी नेसली आहे. त्यावर नाकात नथ, केसात गजरा, हातात मोत्याच्या बांगड्या असा मराठमोळा साजशृंगार केला आहे.  

टॅग्स :शिवानी रांगोळेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार