Join us  

शाहीर साबळेंबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 4:24 PM

‘महाराष्ट्र शाहीर’ अशी ओळख मिळवलेल्या शाहीर साबळेंनी महाराष्ट्रातील लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. ३ सप्टेंबरला शाहीर साबळे यांची जयंती होती. यानिमित्त प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला होता.

‘महाराष्ट्र शाहीर’ अशी ओळख मिळवलेल्या शाहीर साबळेंनी महाराष्ट्रातील लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. लोककला, पोवाडे आणि पथनाट्याच्या माधम्यातून त्यांनी जनजागृतीचं काम केलं. कृष्णराव गणपतराव साबळे हे त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांची कित्येक गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. ३ सप्टेंबरला शाहीर साबळे यांची जयंती होती. यानिमित्त प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली होती.

शाहीर साबळेंबरोबरची गोड आठवण मराठी अभिनेत्रीने या फोटोच्या माध्यमातून शेअर केली होती. या फोटोत शाहीर साबळेंबरोबर दिसणारी चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सना शिंदे आहे. सनाने शाहीर साबळे यांच्या जन्मदिवसानिमित्त हा खास फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शाहीर साबळेंना आदरांजली वाहिली आहे. सना ही सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंची लेक आहे. केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत.  

“आजही तुझ्या मन्नतपुढं रोज...”, शाहरुख खानसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “तुझ्या पोराला अडकवून..."

स्वत:च्याच लग्नात दारूच्या नशेत होते ऋषी आणि नीतू कपूर, अभिनेत्रीनेच केलेला खुलासा, म्हणाल्या, “मी सप्तपदी घेताना...”

केदार शिंदेंनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट काढला आहे. या चित्रपटातून शाहीर साबळेंचा महाराष्ट्र शाहीर होण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदेने या चित्रपटात शाहीर साबळेंच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सनाने अगं बाई अरेच्चा या चित्रपटातही काम केलं आहे. याशिवाय तिने केदार शिंदेंच्या अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका वठवली आहे.

टॅग्स :केदार शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपट