Join us
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र किनाऱ्यावर समृद्धीने केलं फोटोशूट; साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 12:13 IST

Samruddhi kelkar: समृद्धीने काळ्या रंगाच्या साडीमध्ये समुद्र किनारी सुरेख फोटोशूट केलं असून यातील एक कमालीचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर (samruddhi kelkar). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर समृद्धीने अल्पावधीत मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा होत असते. यामध्येच समृद्धी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह आहे. अलिकडेच तिने एक सुरेख व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

समृद्धी कायम तिच्या साधेपणामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. यावेळी सुद्धा तिच्या व्हिडीओने अशीच कमाल केली आहे. समृद्धीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्रकिनारी काळ्या रंगाच्या साडीत भटकंती करताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत तिने गोमू संगतीने या गाण्यातील काही ओळी शेअर केल्या आहेत. या गाण्यावर तिने दिलेले एक्स्प्रेशन्स कमालीचे असून नेटकरी तिच्या या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार