Join us

सई पाठोपाठ सखी गोखलेचीही बॉलिवूडवारी, 'या' हिंदी सिनेमात झळकणार दोन्ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:42 IST

सखीने थेट बॉलिवूडच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

सई ताम्हणकर ही मराठमोळी अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्येही आघाडीवर आहे. सीरिज असो किंवा सिनेमासई ताम्हणकर सगळीकडेच दिसतेय. प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे या मराठमोळ्या अभिनेत्रीही हिंदीत यशस्वी काम करत आहेत. आता या अभिनेत्रींमध्ये सखी गोखलेचाही समावेश होतोय. सखी गोखले (Sakhi Gokhale) लवकरच एका हिंदी सिनेमात भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे याच सिनेमात सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशीही असणार आहेत.

सखी गोखले 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचली. इथूनच तिच्या करिअरला नवी दिशा मिळाली. तरुणाईमध्ये सखी गोखले लोकप्रिय आहे. आता सखीने थेट बॉलिवूडच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. फरहान अख्तर निर्मित 'अग्नी' सिनेमाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. यामध्ये प्रतीक गांधी, दिव्येंदू शर्मा, संयमी खेर, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी यांच्या भूमिका आहेत. यामध्ये सखीही दिसणार आहे.

या नवीन प्रवासाबद्दल सखी म्हणाली, "अग्नी सिनेमात काम करण्याचा माझा अनुभव खूपच छान होता. राहुल ढोलकिया यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. दिव्येंदू शर्मासोबत माझे जास्त सीन्स आहेत. तो उत्तम कोस्टार आहे. शिवाय प्रतीक गांधी, सई, जितू यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शब्दात सांगता येणार नाही."

सखी गोखलेने परदेशात आर्टचं शिक्षण घेतलं आहे. ती उत्तम फोटोग्राफी करते. दिल दोस्ती दुनियादारी मधला तिचा कोस्टार सुव्रत जोशीसोबत तिने लग्नगाठ बांधली. दोघंही बराच काळ परदेशात होते. सुव्रतही मराठी, हिंदी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतो.

टॅग्स :सखी गोखलेसई ताम्हणकरबॉलिवूडसिनेमा