Join us
Daily Top 2Weekly Top 5

'एक rejection मनाला खूप लागलं होतं, आणि...'; ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:27 IST

Rutuja bagwe: गेल्या काही दिवसांपासून ऋतुजा सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे (rutuja bagwe) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच ऋतुजाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला इंडस्ट्रीत आलेल्या वाईट अनुभवावर भाष्य केलं होतं. 'मी सुंदर दिसत नाही म्हणून मला सिनेमासाठी नाकारण्यात आलं', असं वक्तव्य ऋतुजाने केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे बराच काळ वाट पाहिल्यानंतर, स्ट्रगल केल्यानंतर ऋतुजाला लंडन मिसळ या सिनेमात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

'लंडन मिसळ' या सिनेमात ऋतुजाने दुहेरी भूमिका साकारली आहे. यात एक स्त्री पात्र आणि पुरुष पात्र अशा दोन्ही भूमिकांमध्ये तिने या सिनेमात केल्या आहेत. विशेष म्हणजे तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"काल स्वतःला प्रमुख भूमिकेत मोठ्या पद्द्यावर पाहिलं. rejection ला मी घाबरत नाही ना मनाला लाऊन घेत. पण एक rejection मनाला खूप लागलं होतं. आणि मग self doubt मनात निर्माण झाला. आपण चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यास सक्षम नाही आहोत का ?? खरंतर माझं हे स्वप्न नव्हतंच कधी पण “आपण चित्रपटाची heroin होऊ शकत नाही” ह्याची जाणिव करुन दिल्यावर मात्र माझ्या स्वभावानुसार मनात आलं आता हे करायलाच हवं. माझ्या मनात स्वप्न पेरल्या बद्दल त्यांचे आभार “लंडन मिसळ” नायिका/नायक म्हणून माझा पहिला चित्रपट," अशी पोस्ट ऋतुजाने लिहिली आहे.

दरम्यान, ऋतुजा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा असा सगळ्या माध्यमांमध्ये तिचा दांडगा वावर आहे. चंद्र आहे साक्षीला, नांदा सौख्य भरे, अनन्या अशा नाटक, मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

टॅग्स :ऋतुजा बागवेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा