Join us  

'काय तो हॉटनेस?'; रेश्मा शिंदेच्या बोल्ड व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 6:02 PM

Reshma shinde: श्रेया बुगडेपासून ते अनुजा साठेपर्यंत अनेक कलाकारांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे (reshma shinde). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी रेश्मा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. कधी सिंपल लूकमध्ये तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट करुन रेश्मा कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. यावेळी सुद्धा तिने असाच एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.  परंतु, यावेळी तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही भन्नाट कमेंट केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच रेश्माने गोल्डन गुलाबी रंगाच्या साडीत छान बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यानंतर आता तिने याच लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे सध्या तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. इतकचं नाही तर  श्रेया बुगडेपासून ते अनुजा साठेपर्यंत अनेक कलाकारांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

काय आहेत सेलिब्रिटींच्या कमेंट?

श्रेया बुगडेने 'हॉटनेस' म्हणत रेश्माचं कौतुक केलं आहे. तर, 'उफ्फ तेरी अदा' असं अनघा अतुलने म्हटलं आहे. यामध्येच 'काय तो हॉटनेस??' असं अनुजा साठेने म्हटलं आहे.  यांच्यासोबतच विदिशा म्हसकर, साक्षी गांधी या अभिनेत्रींनीही कमेंट केली आहे. 

टॅग्स :रेश्मा शिंदेटेलिव्हिजनसेलिब्रिटी