Join us

Video: सासू-सुनेचा स्वॅगच निराळा; दिपा-सौंदर्याने घातली फुगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 19:01 IST

Reshma shinde -harshada khanvilkar: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दिपा आणि सौंदर्या या सासू-सुनेच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, यात अशा काही मालिका आहेत ज्या त्यांचं वेगळेपण जपत आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा'. या मालिकेत दिपा आणि सौंदर्या या सासू-सुनेच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. यामध्येच आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

'रंग माझा वेगळा' (rang maza vegla) या मालिकेत सौंदर्या इनामदार ही भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर (harshada khanvilkar) यांनी साकारली आहे. तर, दिपाची भूमिका रेश्मा शिंदे (reshma shinde) साकारत आहे. मालिकेत सासू-सुनेची भूमिका पार पाडणाऱ्या या जोडीची पडद्यावर उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळते. मात्र, पडद्यामागेही त्यांच्यात तितकीच छान मैत्री आहे. सध्या सोशल मीडियावर या सासू-सुनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

येत्या रविवारी (१९ मार्च) Star प्रवाह परिवार पुरस्कार २०२३' सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी स्टार प्रवाहवरील सगळेच कलाकार तयारी करत आहेत. यात ही सासू-सुनेची जोडी तरी कशी मागे राहिल. या दोघींनी  या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर चक्क फुगडी घालती. या दोघींच्या फुगडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर त्यांच्यावर कमेंट्स आणि लाइक्सचाही वर्षाव होताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ रेश्माने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रेश्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती सेटवरचे अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीरेश्मा शिंदे