Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:59 IST

मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील व्हिडिओ व्हायरल, बोल्डनेसची होतेय चर्चा

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'लागिर झालं जी'. या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. अज्या आणि शितली ही दोन पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली होती. याबरोबरच लागिर झालं जीमधील जयडी या व्यक्तिरेखेनेदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुरुवातीला अभिनेत्री किरण धाने या भूमिकेत होती. नंतर अभिनेत्री पूर्वा शिंदेने जयडीची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 

पूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अनेकदा पूर्वा हॉट आणि बोल्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूर्वाने एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत ती स्विमिंगपूलमध्ये पोहताना दिसत आहे. या व्हिडिओतील पूर्वाचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. 

पू्र्वाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. "हॉलिवूड हिरोईन आहे का ही", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "दीपिकापेक्षा भारी एक्सप्रेशन" अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने "पाण्यात आग लावलीस" असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

'लागिर झालं  लर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. या मालिकेत तिने श्वेता हे पात्र साकारलं होतं. 

टॅग्स :पूर्वा शिंदेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता