Join us

Y Movie: मुक्ताने जिंकली प्रेक्षकांची मनं; चित्रपट प्रदर्शित होताच अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:13 IST

Mukta barve: मोठ्या प्रतिक्षेनंतर अभिनेत्री  मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिचा ‘वाय’ (Y) हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात मुक्ताच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली असून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Y Marathi Movie : गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘वाय’ (Y) या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. केवळ चर्चाच नव्हे तर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठं कुतूहलही असल्याचं पाहायला मिळालं होतं.  अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित या सिनेमां पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं होतं. यात खासकरुन मुक्ताचा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होता. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर अभिनेत्री  मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिचा ‘वाय’ (Y) हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात मुक्ताच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली असून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित या सिनेमात मुक्ताने महत्त्वपूर्ण आणि वास्तववादी भूमिका साकारली आहे. आजवर मुक्ताने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकली. त्याचप्रमाणे वाय या चित्रपटातील तिची भूमिकादेखील लक्षवेधी ठरली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा प्रदर्शित होऊन काही तास होत नाहीत तर मुक्तावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुक्ताचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला ३ ते साडेतीन स्टार देण्यात आले आहेत.

दरम्यान, या सिनेमाची तिकिट्स बुक करण्यासाठी एक लिंकदेखील तयार करण्यात आली होती. यावरुनही अनेकांनी तिकीट बूक केले. मुक्ताची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. यात प्राजक्ता माळी, संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, ओमकार गोवर्धन ही कलाकार मंडळी आहेत. 

टॅग्स :मुक्ता बर्वेसेलिब्रिटीसिनेमाप्राजक्ता माळी