Join us

'मी शूज चोरले नाहीत'; मृण्मयी-गौतमीचं चप्पलवरुन पुन्हा भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 18:07 IST

Gautami Deshpande: सध्या मृण्मयी आणि गौतमी यांचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून या दोघी त्यांच्यातील गमतीजमती, भांडणं चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे  (Mrunmayee Deshpande) आणि गौतमी देशपांडे (Gautami Deshpande). सख्या बहिणी असलेल्या या दोन्ही अभिनेत्रींनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. या दोघी सोशल मीडियावरही सक्रीय असून कायम एकमेकींसोबतचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असतात.

सध्या मृण्मयी आणि गौतमी यांचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून या दोघी त्यांच्यातील गमतीजमती, भांडणं चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसंच लहान भावंड कसे त्रास देतात हेदेखील मृण्मयी कायम मजेशीर अंदाजात सांगत असते. मात्र, दरवेळी तक्रार करणाऱ्या मृण्मयीची तक्रार यावेळी गौतमीने केली आहे. 'मी चप्पल चोरली नाही', असं म्हणत तिने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर या दोघीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीने मृण्मयीची चप्पल घेतली असून ती पुन्हा परत द्यायला तयार नाही. अखेर दोघी बहिणी दोन्ही पायात दोन वेगवेगळ्या चप्पल घालून संपूर्ण मॉलमध्ये फिरतात. इतकंच नाही तर या दोघी चप्पलच्या दुकानात गेल्यानंतर मृण्मयी सेम टू सेम गौतमीसारखे शूज खरेदी करते. त्यामुळे मी तिचे शूज चोरले नाहीत हे गौतमी सांगते.

"ताईने माझ्यासारखेच सेम शूज घेतले आहेत. त्यामुळे जर आमच्या पायात सेम शूज दिसले तर मी तिचे चोरले असं समजू नका", असं गौतमी या व्हिडीओमध्ये सांगते. गौतमी आणि मृण्मयी कायम सोशल मीडियावर त्यांच्या भांडणाचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचे हे व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठऱत असल्याचं पाहायला मिळतात. 

टॅग्स :गौतमी देशपांडेमृण्मयी देशपांडेसेलिब्रिटीसिनेमा