Join us
Daily Top 2Weekly Top 5

"वाईट वाटलं कारण...", कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:12 IST

"महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची झालेली पडझड पाहून...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना 

Megha Ghadge: प्रसिद्ध नृत्यांगना तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री म्हणून मेघा घाडगेला (Megha Ghadge) ओळखलं जातं. अनेक मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. याशिवाय ती 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सुद्धा सहभागी झाली. त्यामुळे मेघा घागडे चांगलीच चर्चेत आली होती. दरम्यान, मेघा घाडगे ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तसेच आजूबाजूच्या घडामोंडीवर देखील ती परखडपणे बोलत असते. याशिवाय त्याद्वारे तिचे आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दल ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकतीच मेघा घाडगेने अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याला भेट दिली. त्यानिमित्ताने अभिनेत्रीने एक लक्षवेधी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. दरम्यान, मेघाने कुलाबा किल्ल्यावरील काही फोटो शेअर करत आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "अलिबाग येथील कुलाबा फोर्ट ..! छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रमार्गी येणाऱ्या शत्रूच्या देखरेखीसाठी बांधलेला हा किल्ला. प्रत्यक्षात अनुभव घ्यायला हवा. पण, खंत एकच आहे त्याची पडझड झालेली पाहून वाईट वाटलं. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी योग्य ती माहिती देणारा (गाईड ) ही कोणी नव्हतं. असो ..! पण अलिबागमधे आलात तर नक्की भेट द्या..खूप अभिमान वाटतो ..!"

अभिनेत्री मेघा घाडगेला 'लावणी क्वीन' असंही म्हटलं जातं. अभिनेत्रीने 2004 साली आलेल्या 'पछाडलेला' या गाजलेल्या मराठी सिनेमातून पदार्पण केलं होतं. मेघाने नेहमीच तिच्या दमदार नृत्यशैलीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारअलिबागसोशल मीडिया