Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठरलं तर मग' मालिकेत पुढे काय होणार ? जुई गडकरीने थेट सांगून टाकला ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 17:59 IST

मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानकातील ट्विस्टमुळे रसिकांना खिळवून ठेवले आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. यात अर्जुनची भूमिका अभिनेता अमित भानुशालीने तर सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी हिने साकारली आहे. ऐवढंच नाही तर ही मालिका टीआरपीमध्येही पुढे आहे. त्यामुळे या मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे.

 या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली सायली म्हणजेच जुई गडकरी हिनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच एक सत्य बाहेर येणार असल्याचं म्हटलं जात आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं की, "ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत होता, अखेर सत्याचा विजय होणार. त्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग'. जुईच्या या पोस्टमुळे मालिकेत नेमकं काय होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत काही आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. 'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वन वर आहे. आता मालिकेच्या आगामी भागांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सायली आणि अर्जुनच्या नात्यातले बरेचसे पैलू मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहेत. 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पाहू शकतात.  

टॅग्स :जुई गडकरीसेलिब्रिटीमराठी अभिनेतास्टार प्रवाहटेलिव्हिजन